वारणानगर / प्रतिनिधी
मसुद माले ता. पन्हाळा येथील गांवातील महिलेशी अनैतिक संबध आहेत याची विचारणा करणाऱ्या पत्नीला मारहाण करीत असलेच्या रागातून मुलानेच डोक्यात लोखंडी जड वस्तू मारून खून केला. भिकाजी शंकर वगरे वय ४७ असे मयताचे नांव असून ही घटना गुरवार दि. ९ रोजी रात्री ११ वा सुमारास घडली. पोलीस पाटील सौ सुवर्णा सुभाष हिरवे यानी याबाबात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत भिकाजी हा डोक्यात झालेल्या प्रहाराने गंभीर जखमी झालेवर तातडीने त्यास कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पीटल येपे उपचारास दाखल केले असता उपचारा दरम्यान एका तासातच निधन झाले.
मयत भिकाजी वगरे यांच्यात पत्नी उषा व मुलगा अजित यांच्यात भिकाजी बरोबर गावातील महिले बरोबर अनैतिक संबध आहेत या संशयाने वारवांर वाद होत होते याच अनुषागाने गुरुवार दि. रोजी रात्री सुरू झाला याचा राग येवून भिकाजीने पत्नी उषाला लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली आईला का मारहाण करता असे मुलगा अजित याने विचारल्यावर या बाप लेकात कडाक्याचे भांडण सुरू झाले यातच अजितने वडील भिकाजी यांचेवर लोखंडी जड वस्तूने प्रहार केला त्यातच ते खाली कोसळले त्याना तातडीने उपचारासाठी सीपीआर हॉस्पीटल येथे हलवण्यात आले रात्री १२ : ३० वा. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला
या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड, फौजदार सागर पवार यानी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत भिकाजीचा मुलगा अजित यास अटक केली आहे घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल सांळोखे यानी भेट देवून तपासाच्या सूचना केल्या असून तपास स.पो. नि. डोईजड करीत आहेत.