विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक, जनतेला कार्यक्रम खुला नाही
प्रतिनिधी / पणजी
येत्या शुक्रवार 18 जून रोजी होणारा 75 वा क्रांतिदिन मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येणार असून तो शालेय मुले, स्वातंत्र्यसैनिक तसेच जनतेसाठी खुला असणार नाही. त्यावर बंधने घालण्यात आली असून राज्यपाल भगतसिंग कोशियारी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित राहतील. पणजीतील आझाद मैदानावर सकाळी 8.45 वाजता क्रांतिदिन कार्यक्रम होणार असून त्यावेळी फक्त मोजक्याच जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने मर्यादित स्वरुपात साजरा होणार आहे. लोकांनी त्यासाठी येऊ नये, गर्दी करू नये, असे सूचित करण्यात आले आहे.