क्रांतिवीर राजगुरूश् यांच्या जीवनावर आधारित क्रांतिसूर्य राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा ही मराठी वेबसिरीज लवकरच भेटीला येणार आहे.
या वेबसिरीजची मूळ संकल्पना विलास राजगुरू यांची असून सिद्धेश राजगुरू क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. या वेबसिरीजचे लेखन आशिष निनगुरकर करणार आहेत. अशी माहिती क्रांतिवीर राजगुरू यांचे नातू सत्यशील व हर्षवर्धन राजगुरू यांनी दिली. स्वातंत्र्य युद्धात ज्या क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन महान कार्य केले त्यामध्ये क्रांतिवीर राजगुरू यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ही वेबसिरीज म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे. पुणे जिह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेला शिवराम हरी राजगुरू नावाचा मुलगा क्रांतिकारक कसा झाला, याची कहाणी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटसफष्टीतील गणेश मयेकर, जयराज नायर, श्वेता पगार, प्रदीप कडू, अजित वसंत पवार, अभिषेक लगस, योगेश अंधारे, सिद्धेश दळवी, प्रतिश सोनवणे, स्वरूप कासार, अनुराग निनगुरकर, अनुज गोसावी, काव्या निनगुरकर, अशोक कुंदप, किरण निनगुरकर, स्वप्नील निंबाळकर, कल्याणी भारंबे, सुनील जाधव व वैष्णवी राजगुरू आदी कलावंत आणि तंत्रज्ञ हे या वेबसिरीजमध्ये कार्यरत असणार आहेत.
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी पायाखाली अंगार असतानाही स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. कीर्तीसाठी किंवा घरादारात गुंतून न पडता मातफभूमीसाठी या तिघांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले. इन्किलाब झिंदाबादचा नारा देत ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत- हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले. घरादारावर तुळशीपत्र ठेऊन भारतमातेसाठी जे शहीद झाले ते अमरत्वाला प्राप्त ठरले. अशा महान तीन क्रांतिवीर देशभक्तांपैकी महाराष्ट्राची शान असणाऱया राजगुरू यांच्या आयुष्यावरील ही वेबसिरीज भव्यदिव्य असणार आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारांच्या बलिदानामुळ आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे त्याचे मोजमाप आपण शब्दांमध्ये करू शकत नाही. म्हणून या क्रांतिवीरांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद शहीद भगतसिंग यांचे पुतणे अभेयसिंह संधू, प्रा. जगमोहनसिंह, राजगुरू यांचे पुतणे राम राजगुरू, नातू मिलिंद राजगुरू व पणतू शंतनू राजगुरू यांनी व्यक्त केला. लवकरच या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू होणार असून ओटीटी माध्यमातून ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.