प्रतिनिधी / सांगली
चित्पावन परिवार तर्फे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची 175 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष वामनराव बर्वे, वासुदेव दिवेकर, बाळासाहेब पोतदार, शरद फडके, चंद्रकांत पाटणकर, नारायण बेडेकर,गजानन पटवर्धन,संजय भिडे, मधुकर मोडक, वैभव पाटणकर, मिलिंद फडके, विनायक कुन्नूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. क्रां. फडके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला उजाळा देण्यात आला.