प्रतिनिधी/ बेळगाव
मालसा कॉलनी, क्रांतीनगर येथील एका रहिवाशाने खासगी विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
द्यामण्णा लक्ष्मण धोत्रे (वय 52) असे त्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी 3 वाजता त्याच परिसरातील एका खासगी विहिरीवरील झाकण काढुन द्यामण्णाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची उघडकीस आले आहे. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.