कोरोनाकडे सकारात्मक दृष्ठीने पहा : सिंधुदुर्गवासीयांना दिला संदेश
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
जत्रा सिनेमातील ‘कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली’ या गाण्यावर ताल धरायला लावणारी, विविध अवॉर्ड, नामांकने विजेती सिंधुदुर्गची सुकन्या अभिनेत्री क्रांती रेडकर लॉकडाऊन काळात आपल्या लहान जुळय़ा मुलांचे संगोपन तसेच माझ्या स्वतःच्या चित्रपटाची स्रिफ्ट लिहिण्यात मग्न आहेत. स्वत:ची काळजी घ्या व कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा असा सल्ला त्या सिंधुदुर्गवासीयांना देतात.
क्रांती रेडकर या मालवणच्या सुकन्या. सध्या त्या मुंबई अंधेरी येथे कुटुंबा समवेत राहतात. ‘तरुण भारत’च्या सेलिब्रटीज फ्रॉम होम या सदरासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. कोरेनामुळे आज संपूर्ण जग थांबलय. सध्या चित्रपट, मालिकांचे शूटिंग बंद असल्याने माझा जास्तीत-जास्त वेळ हा घरीच जातो. मी कोठेच बाहेर जात नाही. माझा बहुतांक्ष वेळ माझ्या लहान मुलांची काळजी घेण्यात जातो. मला कुकींग करायला फार आवडते. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करुन घरातल्या कुटुंबाना खायला घालायला मला आवडते. मी माझ्या फिटनेसकडेही लक्ष देते. दिवसातले दोन तास मी व्यायामासाठी देते. मी व माझा नवरा घरी एकत्रच जिमिंग करतो. फिट राहाण्यासाठी कोठेही बाहेर जीमला जाण्याची गरज नसते, असेही त्या म्हणाल्या.
मला सिनेमे पहायला खूप आवडतात. मी प्रचंढ प्रमाणात सिनेमे, वेबसिरीज पाहते. इंटरनॅशनल, टर्कीश, स्पॅनिश, आईसलॅडींग, वेगवेगळया प्रांतातले, सिनेमे मी पहाते. त्यातील ‘मिरॅकल इन सेल नंबर सेवन’ ही टर्कीश फिल्म मला खूप आवडली आहे. जत्रा सिनेमातील माझी भूमिका सर्वांना आवडली. ‘कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली’ या गाण्याने मी घराघरात पोहोचले. अलिकडच्या काळातील म्हणाल तर ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘मर्डर मेस्त्राr’ या दोन्ही सिनेमातील भूमिकाही लोकांनी खुप पसंत केल्या. मात्र, मला आवडलेली भूमिका म्हणाल तर ‘ट्रकभर स्वप्न’, ‘कराऱ’, अन ‘शिक्षणाच्या आयचा घो’. या भूमिका माझा नेहमीचा साचा सोडून केलेल्या होत्या. त्यामुळे मी काही तरी वेगळे केल्याचा फिल मला आला.
लॉकडाऊन नसता तर मी साहजिकच कोकणात असते. कारण माझं शूटिंग होतं. मी जो सिनेमा लिहीलाय, दिग्दर्शन करते त्याचं. लॉकडाऊनमुळे ते स्थगित झाले आहे. सद्या मला भरपूर वेळ असल्याने मी त्याच सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करते. त्यात काही चुका असतील, तर त्या काढून टाकणं, अजुन काही चांगलं करता येईल का हे पहातेय. कोरोनाकडे आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. लॉकडाऊन काळात स्वत:ची काळजी घ्या. आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रशासन जे काही सांगतात ते ऐका. त्याप्रमाणे आचरण करा. त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. एका प्रांतातून दुसऱया प्रांतात जाणे टाळा, असेही त्यांनी सांगितले.