वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टोर्क क्राटोस(Tork Kratos) यांनी भारतामध्ये आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल सादर केली आहे. स्पोर्ट्स लूक असणारी सदरची मोटारसायकलची सुरुवातीची किमत हि 1.02 लाख रुपये एक्स शोरुम असणार आहे. किमत दिल्लीमध्ये मिळणाऱया सबसिडीनंतर आहे.
यावर कंपनीने दावा केला आहे, की सदरची दुचाकी ही 180 किलोमीटरचे उत्तम मायलेज देणार आहे. या दुचाकीची दोन मॉडेल उपलब्ध होणार असून याची नावं क्राटोस आणि क्राटोस आर अशी राहणार आहेत.
दोन्ही उत्पादनांचे प्री बुकिंग सुरु झाले आहे. डिलिवरी चालू वर्षातील एप्रिलपासून होणार आहे. सदरच्या मोटारसायकलला 999 रुपये जमा करत कार्यालयीन वेबसाईटवर बुक करता येणार आहे. या दुचाकीची टक्कर भारतीय बाजारात अगोदर पासून असणाऱया रिवोल्ट आरव्ही 400 , जॉय ई बाईक मॉन्स्टर यासोबत राहणार आहे.
डिलिवरी प्रथम मोठय़ा शहरांमध्येच
प्रारंभीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये सदरची दुचाकी सादर करण्यात येणार असून नंतर अन्य शहरांमध्ये डिलिवरीवर भर दिला जाणार आहे.