कपिलतिर्थ तलावात बुडून 7 वर्षीय लहानग्याचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
क्रिकेट खेळत असताना तलावात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कपिलेश्वर रोड मारूती मंदिरा नजिक राहणाऱया स्वराज राजू मोरे (वय वर्षे 7) असे त्या दुर्दैवी लहानग्याचे नाव आहे. कपिलतीर्थ येथील नव्या विसर्जन तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कपिलेश्वर रोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
शनिवारी दुपारच्या सुमारास चार चिमुकले कपिलतिर्थ तलावा शेजारी क्रिकेट खेळत होते. यावेळी एका लहानग्याने बाजुच्या घरावर चेंडू मारला. तो चेंडू घरावर लागून थेट पाण्यात पडला. घरातील लोक ओरडतील या भितीने इतर मुले तेथून पळून गेली परंतु स्वराजचा चेंडू असल्याने तो काढण्यासाठी पाण्यात उतरला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. तलावात बुडला असल्याच्या शक्मयतेने शनिवारी रात्रीपासून शोध मोहिम सुरू होती. रात्री 2 वाजेपर्यंत अग्निशमनचे जवान शोध घेत होते. परंतु त्यांना यश आले नव्हते.
रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास स्वराजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसला. त्यानंतर तो मृतदेह बाहेर काढण्यात आला.