वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार चालू होते. यातून आता ती पूर्णपणे बरी झाली असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
20 मार्च रोजी हरमनप्रीत कौरला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर तिच्यावर डॉक्टरी इलाज सुमारे दोन आठवडे चालू होते. अलीकडेच हरमनप्रीतची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ती निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हरमनप्रीत आणखी काही दिवस आपल्या निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याचे समजते. गेल्या महिन्यात भारताच्या दौऱयावर आलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना हरमनप्रीतला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला या संघाबरोबरच्या टी-20 मालिकेत खेळता आले नव्हते.