वृत्तसंस्था/ काबुल
अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून (सीईओ) अनुभवी रहीमतुल्ला कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाण क्रिकेट क्षेत्रातील कुरेशी हे अनुभवी आणि कुशल क्रिपेट प्रशासक आहेत.
कुरेशी यांना विविध आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये किमान 23 वर्षांचा अनुभव असून त्यांनी विश्व बँक आणि युनायटेड नेशन्समध्ये काम केले आहे. कुरेशी यांच्या नियुक्तीमुळे अफगाण किप्रेट मंडळाचा कारभार पारदर्शक आणि दर्जेदार राहील, अशी आशा मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली.