वृत्तसंस्था/ मेलबर्न
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्टेsिलयात आयसीसीची पुरूषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होते. पण कोरोना महामारी संकटामुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. सदर स्पर्धा लांबणीवर टाकली तर हा निर्णय अत्यंत धोकादायक ठरणार असून यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठय़ा आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
कोरोना महामारी संकटाची परिस्थिती जागतिक स्तरावर अद्याप नियंत्रणाखाली नसल्याचे चित्र पहावयास मिळते. खबरदारीचे उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध केव्हा शिथिल केले जातील याची खात्री देता येत नाही. सदर स्पर्धा ऑक्टोबर-नोव्ह्sंबर दरम्यान होईल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटते. पण या स्पर्धेसंदर्भात आयसीसीचे मत वेगळे असू शकेल. या स्पर्धेसंदर्भात 10 जून रोजी बैठक बोलाविली असून या बैठकीत या स्पर्धेचे भवितव्य निश्चित होईल. सदर स्पर्धा लांबणीवर टाकल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे 80 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स कमाईला मुकावे लागेल.