नवी दिल्ली
देशातील कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील अनेक मान्यवरांनी आपल्या परीने मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी 4 लाख रूपयांचा निधी दिला आहे. श्रीधर यांनी या निधीतील 2 लाख रूपयांची रकम पंतप्रधान निधीला तर दीड लाख रूपयांची रकम तेलंगणाच्या मुख्यमंत्री निधीला आणि 50 हजार रूपयांची रक्कम सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिली आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे बुधवारी 25 लाख रूपयांची मदत पंतप्रधान निधीला दिली आहे. यापूर्वी हॉकी इंडियाने 25 लाख रूपयांची मदत कोरोनाग्रस्तांसाठी दिली आहे.