क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात केजीबी स्पोर्ट्स, क्रिकेट मास्टर, साईराज, शहापूर स्पोर्ट्स, सिद्धकला स्पोर्ट्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. प्रवीण शिंदे, हर्ष बेकवाड, गिरीष नाडकर्णी, अमर कोकरे, प्रमोद पालेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात
आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात नरवीर स्पोर्ट्सने 8 षटकात 8 बाद 62 धावा केल्या. वेंकटेशने 10 धावा केल्या. केजीबीतर्फे प्रवीण शिंदेने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना केजीबीने 6.2 षटकात 5 बाद 66 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. राजू बडवाण्णाचेने 22 धावा केल्या. नरवीरतर्फे जोतिबाने 3 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात क्रिकेट मास्टरने 8 षटकात 3 बाद 145 धावा केल्या. हर्ष बाटेवाडीने 67 धावा केल्या. त्याला उत्तर देताना एआरबी स्पोर्ट्सने 8 षटकात 7 बाद 69 धावा केल्या. अमरने 24 धावा केल्या. क्रिकेट मास्टरतर्फे हर्ष व अक्षय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात साईराजने 8 षटकात बिनबाद 120 धावा केल्या. अनिल सप्लीगाने नाबाद 65, गिरीष नाडकर्णीने नाबाद 47 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मिनारा स्पोर्ट्सने 8 षटकात 4 बाद 72 धावाच केल्या. रमीजने नाबाद 41 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात एसआर स्पोर्ट्सने 8 षटकात 7 बाद 62 धावा केल्या. त्याला उत्तर देताना शहापुर स्पोर्ट्स 7.5 षटकात 8 बाद 66 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. अमर कोकरेने नाबाद 40 धावा केल्या. पाचव्या सामन्यात सिद्धकलाने 8 षटकात 7 बाद 63 धावा केल्या. प्रमोद पालेकरने 15 धावा केल्या. केजीबीतर्फे प्रवीण मनोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना केजीबी स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 8 बाद 59 धावाच केल्या. राजू बडवाण्णाचेने 18 धावा केल्या तर प्रमोद पालेकरने 3 गडी बाद केले.
सोमवारचे सामन -बीके स्पोर्ट्स वि. वराली स्पोर्ट्स सकाळी 9 वा. 2) क्रिकेट फास्ट वि. एवायसी सकाळी 10.30 वा., 3) रामा शेट्टी वि. सेव्हन स्टार दु. 12 वा. 4) गोगो वि. सीटीएम स्पोर्ट्स दु. 1.30 वा., 5) मराठा स्पोर्ट्स वि. पहिल्या सामन्यातील विजेता यांच्यात दु 3 वा.