बांधकाम क्षेत्रात चीनी बनावटींच्या वस्तूंचा वापर टाळण्याचा निर्णय : अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
जगभरासह आपल्या देशात चीनविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. चीनी बनावटीच्या वस्तू, मालावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. भारतीय व्यापाऱयांनीही चीनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगन्य अशा कोल्हापूर क्रिडाई या बांधकाम क्षेत्रातील शिखर संघटनेने स्वदेशीचा नारा दिला आहे. विकसकांनी आपल्या प्रकल्पांसांच्या बांधकामात चिनी साहित्य व उत्पादनांवर अवलंबून न राहता स्वदेशी उत्पादनांवर भर द्यावा, असे आवाहन क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी संघटनेच्या सभासदांना केले आहे.
क्रिडाई कोल्हापूरचे 152 सभासद आहेत. शहरातील सर्व बांधकाम व्यवसायीकाशी निगडीत घटकांनी स्वदेशीचा अवलंब करावा, असेही बेडेकर यांनी म्हटले आहे.
लडाखमधील गलवान खोऱयात चिनी लष्कराशी झालेल्या चकमकीत 20 जवान हुतात्मा झालेल्या जवानांना क्रिडाई कोल्हापूरतर्फे श्रध्दांजली वाहून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यकत करीत, आपण देशासोबत एकजुटीने उभे आहोत, असे बेडेकर यांनी सांगितले.
बेडेकर म्हणाले, चिनी वस्तूंवर अवलंबून न राहता, स्वदेशी ही संकल्पना आपल्या जीवनशैलीत व व्यवसायात प्रभावीपणे अंगीकारावी. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडीत असणाऱया जवळ जवळ 250 उद्योगांनी देखील सध्या चीनमधून आयात होणाऱया उत्पादनाप्रमाणेच स्थानिक लघू व मध्यम उद्योजकांमार्फत स्थानिक पातळीवर उत्पादने तयार करावीत आणि भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेच्या सभासद असणाऱया विकसकांना आम्ही आवाहन केले आहे.
कोरोना आपत्तीकडे संधी म्हणून पाहुया
कोरोनामुळे चीनमधून होणारा मालाचा पुरवठा थांबलेला आहे. प्रकल्प पुर्ण होण्यास विलंब होत आहे. या आपत्तीकडे आपण संधी म्हणून पाहुया. लघु व मध्यम उघोजकांकडून स्थानिक पातळीवर बांधकाम साहित्याचे उत्पादन झाल्यास खरेदीचा वेळ कमी लागेल. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बांधकामे लवकर पुर्ण होतील. विकसक व संघटनेच्या स्वदेशीच्या धोरणामुळे स्थानिक लघु व मध्यम उघोजकांना अधिकच प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामधून सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे एकंदरीत योगदान वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रात वापरल्या जाणाऱया कच्चा मालाची निर्मिती लघु, मध्यम क्षेत्राकडून केली जाते. या निर्मितीस प्रोत्साहन देऊन, आयात होणाऱया बाधंकाम साहित्याच्या उत्पादनासाठी स्थानिक कंपन्यांना पाठिंबा दर्शवण्यास क्रिडाई कोल्हापूर सज्ज आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात देशातील 5 कोटी 20 लाख कामगार कार्यरत आहेत. विदेशी ऐवजी स्वदेशी या धोरणामुळे रोजगाराच्या संधीमध्ये आणखी वाढ होण्यास मदत होईल.- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर