बॉलिवूडमध्ये सुंदर आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी क्रिती सेनन सदैव चर्चेत असते. चित्रपटसृष्टीत आउटसाइडर म्हणून स्थान निर्माण करणे अत्यंत अवघड असते. पण क्रितीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासह एक मोठा पल्लाही गाठला आहे. क्रितीने हिरोपंती चित्रपटाद्वारे स्वतःची कारकीर्द सुरू केली होती. क्रितीला रविवारी बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण झाली आहेत.
क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधून बीटेक पदवी प्राप्त केली आहे. पण तिने अभिनयाच्या जगतात स्वतःची कारकीर्द निर्माण करण्याचा निर्णय घेतला. क्रितीने आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध धाटणीचे चित्रपट स्वीकारत तिने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
क्रितीकडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. ती प्रभाससोबत आदिपुरुष चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर वरुण धवनसोबत आणखी एक चित्रपट ती करणार आहे. तसेच बच्चन पांडे आणि मिमी या चित्रपटांमधूनही ती झळकणार आहे.