सर्वात लोकप्रिय करंसी अधिक प्रमाणात प्रभावीत – बिटकॉईनसह अन्य चलनाचा समावेश
मुंबई
क्रिप्टोकरंसीमध्ये (आभासी चलन) गुंतवणूक करणाऱया गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. मागील चोवीस तासात क्रिप्टोच्या विविध करंसीजच्या किंमतीत 25 टक्क्यांची घसरण राहिली आहे. यामध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱया करंसीत बिटकॉईनमध्ये 8 टक्क्यांची घसरण राहिली आहे तर एथरियमची किंमत 21 टक्क्यांनी प्रभावीत झाली आहे.
बिनांस कॉईन, एक्सआरपी आणि कार्डानोचे भाव हे 10 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. या करंसीमध्ये घसरणीचा कल आगामी काळातही चालू राहण्याचे संकेत आहेत. बिटकॉईनची किमत 31,938 हजार डॉलरच्या जवळपास आली आहे. एथरियमची किमत ही 1,890 डॉलरच्या जवळपास राहिली आहे. याप्रकारे बिनांस कॉईनच्या किमतीत 10.72 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सर्वात मोठा व्यवसाय चीनमध्ये
चीनमध्ये क्रिप्टोकरंसीचा व्यवसाय जोरात असून जगातील बिटकॉईनच्या उत्पादनात अर्धा हिस्सा हा चीनचा आहे.
चीनकडून क्रिप्टोकरंसी मायनिंगवर निर्बंध लावण्याची योजना तेजीत आहे.
चढउतार राहणार
अभ्यासकांच्या मते क्रिप्टो करंसीच्या किमतीमधील चढउतार आगामी काळातही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. विक्रीमधील हा कल क्रिप्टोसोबत जागतिक पातळीवरील काही इक्विटी बाजारावर दिसून येणार आहे. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील अंदाजापेक्षाही सर्वाधिक झालेली महागाई होय.