नवी दिल्ली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आभासी चलनाद्वारे मिळणाऱया उत्पन्नावर 30 टक्के इतका कर निश्चित केला आहे. क्रिप्टोकरन्सीमार्फत होणाऱया व्यवहाराच्या उत्पन्नावर यापुढे 30 टक्के इतका कर संबंधीतांना भरावा लागणार आहे. गेल्या काही वर्षापासून या आभासी चलनाबाबत जागतिक स्तरावर बोलले जात होते.
गिफ्टरुपात किंवा भेटवस्तू स्वरूपात डिजिटल मालमत्तांमध्ये व्यवहार झाल्यास त्यावर कर लावला जाणार आहे. सदरच्या कराची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने स्वतःचे आभासी चलन जारी करण्याचा निर्णय घेतला असून ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर हे चलन दाखल होईल.
अभासीचलनयाचआर्थिकवर्षातहोणारसादर
डिजिटल रुपी अर्थात आभासी चलन हे रिझर्व्ह बँकेकडून 2022-23 या आर्थिक वर्षातच सादर केले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने सदरचे नवे आभासी चलन सादर केले जाणार आहे. गुंतवणूकीसाठी म्हणून अर्थसहाय्यासाठी 1 लाख कोटी रुपये राज्यांना पुरवले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.