साहित्य : 1 वाटी मसूरडाळ, 50 ग्रॅम तूप, 1 चमचा जिरं, 2 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी तुकडा, 3 लवंग, 2 वेलची, 1 कांदा बारीक चिरून, 1 वाटी टोमॅटो प्युरी, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या चिरून, 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा कसूरीमेथी, 2 चमचे क्रिम, सजावटीसाठी कोथिंबीर
कृती : मसूरडाळ धुवून निथळावी. त्यात पाणी आणि मीठ मिक्स करून कुकरला लावून दोन शिट्टय़ा घ्याव्यात. गरम तुपात जिरं टाकावे. नंतर त्यात वेलची, लवंग, तमालपत्र आणि दालचिनी टाकावी. मिश्रण हलक्या सोनेरी रंगावर आले की त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवावा. नंतर त्यात हिरवी मिरची टाकावी. आता त्यात टोमॅटो प्युरी मिक्स करावी. नंतर लाल तिखट पावडर, हळद पावडर, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट टाकून मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे. वरून कसूरीमेथी टाकावी. नंतर मसूरडाळ मिक्स करावी. आवश्यकतेनुसार पाणीही घालू शकता. मिश्रण एकजीव झाले की आच बंद करून वरून क्रिम घालावे. तयार क्रीमी डाळ कोथिंबीरीने सजवून चपाती अथवा भातासोबत खाण्यास द्या.