नवी दिल्ली
क्रिसील या संस्थेने भारताच्या चालू आर्थिक वर्षाचा अर्थात सन 2021-22 साठीचा आर्थिक विकासदराचा अंदाज नव्याने वर्तवला असून त्यात घट करण्यात आली आहे. संस्थेने भारताचा विकासदर 8.2 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज नव्याने मांडला आहे. याआधी संस्थेने हा अंदाज 11 टक्के इतका वर्तवला होता. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसीलने सांगितले की, जर का कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱया लाटेचा प्रताप जूनअखेरपर्यंत कमी झाला तर 2021-22 वर्षात विकासदर 8.2 टक्के इतका राहिल. तर मेअखेरपर्यंत दुसरी लाट राहिली तर आर्थिक विकास दर 9.8 टक्के इतका राहिल, असाही अंदाज क्रिसीलने मांडला आहे.