वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱया क्रिस्टल पॅलेस फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी पॅट्रीक व्हिएरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिएरा हे यापूर्वी नीस क्लबचे बॉस होते.
यापूर्वी रॉय हॉडसन हे क्रिस्टल पॅलेसचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्या व्यवस्थापकपदाचा कालावधी संपुष्टात आल्याने पॅट्रीक व्हिएरा यांची व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिस्टल पॅलेस आणि व्हिएरा यांच्यात तीन वर्षांचा करार झाला आहे. 2021 च्या प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात क्रिस्टल पॅलेसचा सलामीचा सामना चेल्सी संघाबरोबर 14 ऑगस्टला होणार आहे.