ऑनलाईन टीम / बर्लिन :
त्यावेळी सचिन तेंडुलकरला संघ सहकाऱयांनी खांद्यावर उचलून घेत मैदानाला विजयी फेरी मारली होती. तसेच लॉरेसचा स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार फॉम्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन आणि फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना जाहीर झालाय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर ही एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचा म्हणून ओळखला जाणारा ‘लॉरियस स्पोटींग मोमेंट 2000-2020 पुरस्कार सचिन तेंडुलकरने पटकावला आहे. जर्मनीची राजधनी बर्लिनमध्ये सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार जाहीर झालाय.
या पुरस्काराला ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असं शीर्षक देण्यात आलंय. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीत 6 विश्वचषक खेळले. त्यापैकी सहावा म्हणजे 2011 सालचा विश्वचषक भारताने जिंकला होता.