बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा
वार्ताहर / सावईवेरे
बॅडमिंटन खेळात नियमित सराव करून कौशल्य व खेळाचे तंत्र आत्मसात करणे अंत्यत महत्वाचे असते. क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खेळाडूने पक्का निर्धार करून सराव, शिस्त व त्यात स्वतःला झोकून देण्याची इच्छा असेल तर तो खेळाडू यशस्वी बनत असल्याचे प्रतिपादन गीतेश वेरेकर यांनी केले.
वळवई येथील रायझिंग शटलर्स क्लबतर्फे सावईवेरे व वळवई ग्रामपंचायत पातळीवरील आयोजित केलेल्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळय़ात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी मनोज फडते, विजय सावंत, सुभाष शेट, विनीत वेंगुर्लेकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेतेपद वृषभ व अथर्व जोडीला पटकावले. तर रोहित व महेश जोडीला उपविजेतेपद प्राप्त झाले.
उपान्त्य सामन्यात पराभूत झालेल्या शिवम व विराज तारी तसेच अमेय व प्रेजल या जोडींना पारितोषिके देण्यात आली. शिवाय उत्कृष्ट प्लेसर गीतेश, उत्कृष्ट स्मेशर अथर्व, उत्कृष्ट डिफेंस महेश तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकमेव महिला स्पर्धक मानसी हिला खास बक्षिस देण्यात आले. लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत अंश यास विजेतेपद मिळाले.
विजय व सुभाष शेट यांनीही विचार मांडले. सुत्रसंचालन व आभार सन्मेश शेट यांनी केले.