वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या एटीपी चषक सांघिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत आता चिली आणि सर्बिया यांच्यातील लढतीत चिलीच्या गॅरीनने लेजोव्हिकचा पराभव केला तर सर्बियाच्या क्रेजिनोव्हिकने चिलीच्या टेबिलोचा पराभव केला. आता या लढतीतील दुहेरीचा सामना निर्णायक ठरणार आहे.
अ गटातील झालेल्या या लढतीमध्ये चिलीच्या गॅरीनने पहिल्या एकेरी सामन्यात सर्बियाच्या लेजोव्हिकचा 6-4, 4-6, 3-0 असा पराभव केला. दोन तास चालू असलेल्या या सामन्यात दुखापतीमुळे लेजोव्हिकने तिसरा सेट सुरू असताना माघार घेतली. दुसऱया एकेरी सामन्यात सर्बियाच्या क्रेजिनोव्हिक चिलीच्या टेबिलोचा 6-4, 3-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. आता या लढतीतील विजयी संघ निर्णायक दुहेरी सामन्यावर निश्चित होईल. आता सर्बियाचे कॅसिक आणि सेबानोव्ह तसेच चिलीचे व्हेरा आणि टेबिलो यांच्यात दुहेरीचा सामना खेळविला जाणार आहे.