मुंबई
हुंडाई कंपनीच्या क्रेटा या गाडीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडेच बाजारात दाखल झालेल्या या कारकरीता 55 हजार जणांनी बुकिंग केले असल्याचे सांगण्यात येत आहे. 2015 मध्ये ही गाडी बाजारात प्रथम दाखल करण्यात आली होती. त्याच्यानंतर या गाडीची लोकप्रियता इतकी वाढली की आजवर या गाडीचे 4 लाख 85 हजार ग्राहक झाले आहेत. गेल्या मार्चमध्ये आलेल्या क्रेटा या नव्या गाडीच्या आगमनानंतर सुमारे 55 हजार जणांनी गाडीचे बुकिंग केले आहे.