सावंतवाडी/ प्रतिनिधी–
क्रेडाई सावंतवाडीतर्फे सावंतवाडी नगरपालिकेला पीपीई किट प्रदान करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात सफाई कामगार तसेच आता संस्थात्मक विलगीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत. तेथे कामगारांना पी पी किट आवश्यक आहे. त्यानुसार क्रेडाई ने पुढाकार घेतला आहे आणि हे किट प्रधान केले.
सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आव्हानाला मान देवून क्रेडाई सावंतवाडीनै नगरपालिकेला नुकतेच शंभर पी पीई किट दिले. यावेळी नगराध्यक्ष श्री. संजू परब, मुख्याधिकारी श्री.जयंत जावडेकर, क्रेडाई सावंतवाडी अध्यक्ष श्री. नीरज मोहन देसाई ,सचिव श्री गोविंद खोर्जूवेकर ,खजिनदार श्री.यशवंत नाईक आणि संजय सावंत, अजय गोंदावळे आदी सदस्य उपस्थित होते.