कुपवाड / प्रतिनिधी
मिरज एमआयडीसीत मुख्य रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मोटारसायकलला क्रेनने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. यात रविंद्र विठ्ठल चव्हाण वय ६६,रा.माजी सैनिक वसाहत, मिरज असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत कुपवाड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
चव्हाण यांच्या अंगावरुन क्रेनचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी क्रेनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अपघातानंतर क्रेनचालक फरार झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.