बेळगाव : बलराम स्पोर्ट्स क्लब आयोजित राजू काणकोणकर पुरस्कृत 29 व्या श्री बलराम क्रॉसकंट्री स्पर्धेत प्रमोद गावडे, लक्ष्मण पाटील, साईश्री पाटील, संदीप नायक, रंजिता नायक तर वयस्करांमध्ये सुरेश देवरमनी यांनी विजेतेपद पटकाविले.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता, शांतता व जातीय सलोख यांचा संदेश देण्यासाठी गेली 28 वर्षे ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. स्पर्धेची सुरूवात ऍड. धनराज गवळी व सुभाष नाईक यांनी ध्वज उंचावून केली.
निकाल पुढीलप्रमाणे-
पुरूष गट 1) प्रमोद गावडे, 2) सुनिल नायक, 3) परशराम कुनगी, 4) विशाल कदम, 5) प्रवीण धामणेकर.
8 वी ते 10 वी गट मुले – लक्ष्मण पाटील, 2) विनय चिक्कलदिन्नी, 3) जीवन कळबळी, 4) नारायण कलखांबकर, 5) कार्तिक लगमण्णा.
मुलींचा गट – 1) साईश्री पाटील 2) अमृता काजरेकर, 3) कृपा सारंग, 4) संचिता पाटील, 5) तनिषा पिंटो.
12 वर्षाखालील गट मुले – 1) संदीप नायक, 2) मनोज बेळगावी, श्रीनाथ कलखांबकर, 4) हालाप्पा गौरव, 5) संदीप हलेप्पा. मुली- 1) रंजिता नायक, 2) रक्षिता नायक, 3) खुशी पाटील, 4) भूमिका बेळगावी, 5) प्राची भवानी.
वयस्कर गट – 1) सुरेश देवरमनी (70 वर्षे), 2) धोंडीराम शिंदे (वय 74).
विजेत्या स्पर्धकांना वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी, धोंडीराम शिंदे, सुभाष नाईक, ऍड. धनराज गवळी, ऍड. श्रीकांत पवार, सुजाता गवळी आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी खेळाडुंना मिठाई वाटण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बलराम स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.