वृत्तसंस्था/ कतार
पुढील महिन्यात होणाऱया क्लब विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतून ऑकलंड सिटी संघाने कोरोना समस्येमुळे माघार घेतली आहे. सदर माहिती न्यूझीलंडच्या फुटबॉल संघटनेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
2020 सालातील फिफाची क्लब विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. यापूर्वी सदर स्पर्धा डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय फिफाच्या नियंत्रण समितीने घेतला होता. कोरोनाच्या क्वारंटाईन सुविधेसाठी अत्यावश्यक व्यवस्था फिफाकडून झाली नसल्याने न्यूझीलंडच्या ऑकलंड सिटीने या स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती न्यूझीलंड फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.