अभिनेत्री आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱया भूमी पेडणेकरला न्यूयॉर्कमध्ये होणाऱया क्लायमेट वीकसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भूमीला क्लायमेट वीक एनवायसी 2021 मध्ये आमंत्रित करून आम्हाला आनंद होत आहे. क्लायमेट वीक हे जगभरात हवामानाशी संबंधित हालचालींना प्रभावित करणारे एक महत्त्वपूर्ण आयोजन असल्याचे क्लायमेट ग्रुपच्या भारतातील कार्यकारी संचालिका दिव्या शर्मा यांनी सांगितले आहे.
क्लायमेट वीक एनवायसीदरम्यान भूमी 23 सप्टेंबर रोजी संबोधित करणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, सीओपी26 आणि सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या भागीदारीत क्लायमेट ग्रुपकडून संचालित क्लायमेट वीक एनवायसी या व्यासपीठावर जगभरातील निसर्गाशी संबंधित घडामोडी प्रदर्शित करण्यासह अधिक कार्य करण्याच्या पद्धतींवर चर्चा होते. 2050 पर्यंत जगाचे कर्बवायू उत्सर्जन शून्यावर आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.
हवामान संकटावरून सुरू असलेल्या जागतिक मोहिमेत भारत कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका पार पाडणार आणि यात भारतीय उद्योगक्षेत्राची भूमिका याबद्दल भूमिका बोलणार आहे.