वृत्तसंस्था/ शिकागो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या शिकागो फॉल क्लासिक महिलांच्या आंतर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या 38 वर्षीय माजी टॉप सीडेड किम क्लिस्टर्सचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. तैवानच्या वेईने क्लिस्टर्सचा पराभव केला.
बऱयाच कालावधीनंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणाऱया क्लिस्टर्सला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात तैवानच्या हेस वेईने क्लिस्टर्सचा 6-3, 5-7, 6-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. 2020 फेब्रुवारी महिन्यात क्लिस्टर्सने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर तिचे या स्पर्धेतून दुसऱयांदा पुनरागमन झाले होते.