ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी दिल्लीतील क्वारंटाईन सेंटरमधील दोन तबलिगींनी त्यांच्या समोरच उघड्यावर शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाईन सेंटरकडून दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन तबलिगी दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना नरेला सेंटरमध्ये दाखल क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे दोघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत. क्वारंटाईन परिसराचे सॅनिटाझेशन करताना तबलिगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी 212 नंबरच्या खोली बाहेर काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.