विशेष स्वरुपात सादर होणार मोडेम ः सीईओ अमोन यांची माहिती
नवी दिल्ली
अमेरिकन चिप निर्मितीमधील प्रसिद्ध कंपनी क्वालकॉमने स्नॅपड्रगन एक्स 65 5 जी मोडेम सादर केले आहे. सदरचे मॉडेल हे 4 आवृत्तीमधील असून 5 जी मोडेम असल्याची माहिती आहे. यामध्ये 5 जी नेटवर्कवर 10 जीबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. कंपनीने याला विशेष पद्धतीने तयार केले असून वायरलेस 5 जी नेटवर्कवर वेगवान स्पीड प्राप्त होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
कंपनीने स्नॅपड्रगन एक्स65 5 जी मोडेमसोबत स्नॅपडॅगन एक्स62 2 जी मोडेम आरएफ (रेडिओ-फ्रीक्वेंसी) सिस्टमची घोषणा केली आहे. हा मोबाईल ब्रॉडबँड ऍप्लिकेशनवर काम करणार असून यासाठी मोडेम-टू-अँटीनासाठी सोल्यूशनवर काम करणार आहे.
5-जी स्पीडसाठी नवा माइलस्टोन
क्वालकॉमचे अध्यक्ष आणि सीईओ इलेक्ट, क्रिस्टियानो अमोन यांनी म्हटल्याप्रमाणे सध्याच्या कालावधीत 5जी सेवेला सर्वात मोठी मागणी बाजारात राहणार आहे. यासाठी टेक्नॉलॉजीसोबत सर्व उद्योगक्षेत्राला मोठय़ा प्रमाणात लाभ होणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रगन एक्स65 5जी मोडेम-आरएफ सिस्टमसाठी एक माइलस्टोन बनण्याची तयारी करत असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले आहे.
10जीबीपीएस स्पीडचे फायदे
क्वालकॉम स्नॅपड्रगन एक्स65 5जी मोडेमवर 10 जीबीपीएसपर्यंत स्पीड प्राप्त होणार आहे. इंटरनेट स्पीडवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिकच्या केबीमधील फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी सोय उपलब्ध होणार आहे.