कोलकाता / वृत्तसंस्था
सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील क्वॉलिफायर-1 व एलिमिनेटर लढतीसाठी ईडन गार्डन्स स्टेडियम सज्ज असल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी दिली. यंदा आयपीएलमधील शेवटचा साखळी सामना दि. 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार असून त्यानतंर प्ले-ऑफ फेरीला दि. 24 मे पासून ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरु होईल. या लढतींसाठी पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद मोदी स्टेडियमवर क्वॉलिफायर-2 लढत 27 मे रोजी तर निर्णायक फायनल दि. 29 मे रोजी खेळवली जाईल.