9 जणांना अटक, 14,360 रुपये जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
खंजर गल्ली येथील मटका अड्डय़ावर छापा टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 14 हजार 360 रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल संच, कॅलक्मयुलेटर, मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आणखी एक जण फरारी झाला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली. खंजर गल्ली येथील केईबी ऑफिसजवळ असलेल्या ऑटोरिक्षा स्टँड परिसरात मटका सुरू असल्याची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या सर्व नऊ जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा कलम 78 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.
फईम जिलानी कोतवाल (वय 40) रा. खंजर गल्ली, सलीम नूरजहान पठाण (वय 43) रा. खंजर गल्ली, राजू ज्ञानेश्वर गोणे (वय 45) रा. शिवबसवनगर, बसवराज मल्लाप्पा पाटील (वय 32) रा. संभाजी गल्ली, महाद्वार रोड, मुदस्सर मेहबूब देसाई (वय 26) रा. खंजर गल्ली, रिजवान बाबाजान भातकांडे (वय 42), रा. वंटमुरी क्रॉस, मुश्ताक अहमद ताशिलदार (वय 41) रा. नवी गल्ली, शहापूर, बसाप्पा बाळप्पा मादर (वय 68) रा. घोडगेरी, ता. हुक्केरी, भावकाण्णा भरमा गड्डेकर (वय 65) रा. मारुती गल्ली, यमनापूर अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. मेहबूब देसाई, रा. खंजर गल्ली हा फरारी झाला आहे.