मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
खंजर गल्ली येथे एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फहीम झिलानी कोतवाल (रा. खंजर गल्ली) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून 710 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी फहीमची चौकशी केली असता आपण बाळु तोपिनकट्टी याला पोहचवत असल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्यावरही एफआयआर दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील आणखी एका मटका अड्डय़ावर छापा टाकून एका मटकाबुकीला अटक करुन 600 रुपये रोख रक्कम जप्त केली होती. शुक्रवारी ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.