पालकमंत्री बाळासाहेब पाटील
कराड/ प्रतिनिधी
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होणे जनतेच्या व पक्षकारांच्या हिताचे असल्याने व या प्रश्नाचे गांभीर्य माहिती असल्याने सर्किट बेंच स्थापणेसाठी मी, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे पालकमंत्री व लोकप्रतिनिधी शासन स्तरावर पूर्ण ताकतीने प्रयत्नशील आहोत. खंडपीठ कृती समिती व मुख्यमंत्री यांची यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना दिले.
खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज कराड बार असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. विद्याराणी साळुंखे व खंडपीठ कृती समितीचे सेक्रेटरी ऍड. विजयकुमार ताटे-देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नामदार बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी संदीप चौगुले, लोकल ऑडिटर संकेत सावर्डेकर, माजी सेक्रेटरी व्ही. आर. पाटील, गिरीश नाईक, अभिजित हिलगे यांच्यासोबत कराड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रम कुलकर्णी, सेक्रेटरी महेश पाटील, जॉईंट सेक्रेटरी शाहीन बारगीर, ज्येष्ठ वकील एम. ए. पाटील, सी. बी. कदम, चिंगळे, एस. डी. पाटील, पी. एन. पाटील, संजय महाडिक जी. बी मोहिते उपस्थित होते.