प्रतिनिधी/ सातारा
दुसऱया टप्प्यात जिल्हय़ात सुरु असलेली कोरोना संसर्गाची स्थिती कधी दिलासा तर कधी अचानक चिंता अशी हेलकावे देत आहे. कधी बाधित वाढ 100 च्या खाली तर कधी 200 नजिक अशी आकडेवारी येत असतानाच कोरोनामुक्तीची आकडेवारीही तशीच येत आहे. सोमवारी कोरोनामुक्तीच्या आकडय़ांनी चांगला दिलासा दिला असून 183 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, खंडाळा, फलटण, खटाव, कोरेगावसह सातारा तालुक्यातील वाढ चिंता वाढवत आहे.
आकडेवारीत मोठे चढउतार
जिल्हय़ात फेब्रुवारी महिन्यात बाधित वाढीचा वेग वाढल्याने मार्च महिन्यात पुन्हा अशंतः लॉकडाऊन सुरु आहे. रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र, कधी कधी अचानक बाधित वाढीचा आकडा 200 च्या नजिक जात आहे. तर कधी तो 100 च्या खालीही येत आहे. त्यातच कोरोनामुक्तीचा वेगही मंदावल्याने आजमितीस ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पुन्हा दीड हजारांच्यावर आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 300 च्या पुढे स्थिर राहिलेले आहे.
लसीकरण सुरु पण नियम पाळाच
जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला असून रविवारीच्या अहवालात तब्बल 182 जणांचा अहवाल बाधित आल्याने चिंता वाढू लागलीय. कोरोना आकडेवारीचे चढउतार सुरु असतानाच जिल्हय़ात 144 ठिकाणी लसीकरण वेगाने सुरु झाले आहे. मात्र, लस घेतल्यानंतर देखील मास्क, स्वच्छता व सुरक्षित अंतर ही त्रिसुत्री पाळतच पुढील काही महिने वाटचाल करावी लागणार आहे. या स्थितीत फक्त मृत्यूदर घटल्याचा दिलासा असून बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश परिस्थिती देत आहे.
नऊ तालुक्यात दोन अंकी वाढ
फलटण तालुका 24 बाधित आढळून आले असून त्या पाठोपाठ खटाव तालुका 21, सातारा तालुका 18, कोरेगाव तालुका 18, कराड तालुका 15, माण तालुका 15, वाई तालुका 14, जावली तालुका 14 अशी 9 तालुक्यांमध्ये दोन अंकी वाढ झालीय तर महाबळेश्वर तालुका 3, पाटण तालुका 3 या दोन तालुक्यात एक अंकी वाढ झाल्याने कोणताही तालुका रविवारच्या अहवालात निरंक राहिला नव्हता.
एका बाधिताचा मृत्यू
जिह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये नागठाणे ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
362 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 38, कराड 79, फलटण 11, कोरेगाव 28, वाई 35, खंडाळा 11, रायगाव 8, पानमळेवाडी 48, महाबळेश्वर 15, दहिवडी 23, म्हसवड 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज 59 असे एकूण 362 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे.