प्रतिनिधी / वडूज / खटाव
खटाव-पुसेगाव मार्गावर डंगारे वस्तीनजीक दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकाचा जागीच मृत्यू होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.मयत प्रविण जयवंत चव्हाण हा वीज वितरण कंपनी चा कर्मचारी आहे. तर जखमींना शासकीय रुग्णालयात पुढील उचरासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थाळावरून व पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.13 ) रात्री 8.30 च्या सुमारास वाकेश्वर (ता.खटाव )येथील प्रविण जयवंत चव्हाण हे आपल्या एम.एच.11 सी.डी. 4153 दुचाकीवरून पुसेगावहून गावाकडे येत होते. त्याच वेळेस विरुध्द दिशेन दोन युवक स्पलेंडर प्लस एम.एच.22 सी.डी.8103 वरून भरधाव वेगात येत होती. अरुंद पुलावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात दोन्हीही दुचांकी समोरोसमोर जोरदार धडक झाली. या धडकेत प्रविण गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रविण चव्हाण हे वीज वितरणचे कर्मचारी होत. तर समोरून येणाया दुचाकी वरील स्वप्निल चंद्रकांत जरांबे व तुषार भरत आंबेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या चव्हाण यांचे चुलत बंधू अरविंद सुदाम चव्हाण यांनी ’त्या’ दोन मोटार सायकल चालकाविरोधात पुसेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून एस.एस.भोसले पुढील तपास करत आहे.