वार्ताहर/खडकलाट :
गेल्या पंधरा दिवसांपासून गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आधीच परिसरातील नागरिक कोरोना महामारीच्या भीतीखाली असून आता डासांपासून इतर रोगराई पसरू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात सर्वत्र फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गावात सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत विकास अधिकारी बाडकर यांनी स्वच्छता कर्मचाऱयांमार्फत गावातील गल्लीबोळात, चौकाचौकात औषध फवारणीसह सॅनिटायझर फवारणी केली आहे.