प्रतिनिधी /बेळगाव
खडक गल्ली येथील श्री युवक मंडळातर्फे किल्ले भ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. हरिश्चंद्रगड, भैरवगड, सांदन व्हॅली, हरिहरगड अशी खडतर पदभ्रमंती युवकांनी पूर्ण केली. 30 शिवभक्तांनी या पदभ्रमंतीमध्ये सहभाग घेतला होता.
खिरेश्वर गावातून मोहिमेला सुरुवात झाली. टोलारखिंडमार्गे पदभ्रमंती हरिश्चंद गडावर पोहोचली. ओंकार पाटील, रोहीत पाटील, विनायक आपटेकर यांच्या हस्ते हरिश्चंद्र गडावरील शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. कोकण गडाचे दर्शन घेऊन गणेश गुहेमध्ये मुक्काम करण्यात आला. दुसऱया दिवशी मोरोशी गावातून भैरव गडावर पदभ्रमंती पोहोचली. गडावरील भैरीचे पूजन गौरव पाटील, सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आशिया खंडातील दुसऱया क्रमांकाची खोल दरी असणाऱया सांदन व्हॅली पाहून सांम्रद या गावी मुक्काम करण्यात आला.
हरिहर गडावर पोहोचल्यानंतर कार्तिक गवळी, शिवकुमार गुरव यांच्या हस्ते शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. ध्येयमंत्राने पदभ्रमंतीची सांगता झाली. ओsंकार पाटील, सुधीर पाटील, गौरव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदभ्रमंती झाली.