मुंबई/प्रतिनिधी
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. आता त्या समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची मागणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. जावयाला अटक केल्यानंतर एकनाथ खडसे आणि त्यांची पटणे मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावला आहे.
दरम्यान हे सर्व सुरु असताना अचानक राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. चौकशी नंतर या समितीने आपला गोपनीय अहवालही सरकारकडे सुपूर्द केला होता. मात्र, हा अहवाला मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची मागणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.