8 डिसेंबरपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
स्वराज्याची राजधानी असणाऱया किल्ले रायगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली 32 मण सुवर्ण सिंहासन तयार केले जाणार आहे. या सिंहासनाच्या निधी संकलना सोबतच या सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजना आखण्यात आली आहे. यासाठी बेळगावमधून चार तुकडय़ा तयार केल्या जाणार असून त्यापैकी पहिली यादी नुकताच करण्यात आल्याची माहिता बैठकीत देण्यात आली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या ग्रामीण विभागातर्फे ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सुवर्ण सिंहासन व खडा पहारा याविषयीची माहिती देण्यात आली. सुवर्ण सिंहासनासाठी प्रत्येक शिवभक्ताला वर्षातून एक दिवस सुवर्ण सिंहासनाला पहारा देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नाव नोंदणी करण्यात आली असून याची पहिली तुकडी तयार करण्यात आली आहे. येत्या दि. 8 डिसेंबरला उर्वरित तुकडय़ांची यादी तयार केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी बैठकीत दिली.
नाव नोंदणी करण्याचे आवाहन
अद्यापही ज्या धारकांनी खडा पहारा या योजनेसाठी नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी 8 डिसेंबर पूर्वी आपल्या गाव प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन या बैठकीत तालुकाप्रमुख कल्लाप्पा पाटील यांनी केले.
बैठकीला शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख किरण बडवानाचे, हिरामणी मुचंडीकर, महेश पाटील, सचिन चोपडे, प्रसाद हलगेकर, रवी पिसाळे, केशव सांबरेकर, बंडू पाटील, तुकाराम पाटील, मारुती बेळगावकर परशराम पाटील, रवी मुरारी, ऋतिक पाटील, कपिल पाटील यांच्यासह तालुक्मयातील शिवभक्त व शिवपति÷ानचे कार्यकर्ते मोठय़ाप्रमाणात उपस्थित होते.