प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या माध्यमातून व भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून रायगड येथे 32 मण सुवर्ण सिंहासन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या सिंहासनाला पहारा देण्यासाठी खडा पहारा मोहिमेंतर्गत नावनोंदणी केली जात आहे. नावनोंदणी करण्यासाठी नुकताच समर्थनगर येथे कार्यक्रम करण्यात आला. या जागृतीवेळी 30 हून अधिक शिवभक्तांनी नावनोंदणी केली.
उमेश ताशिलदार व तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी खडा पहाराविषयी माहिती दिली. एक दिवस रायगडाच्या सेवेसाठी हा उपक्रम आखण्यात आला. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, अजित जाधव, उमेश ताशिलदार, गजानन पाटील, नितीन कुलकर्णी, गजानन निलजकर, अतुल केसरकर, गिरीष कणेरी, शुभम मोरे, राम कटारे, नागेश गावडे, निर्मल कणेरी, सचिन कणेरी, कृष्णा इटगीकर, रमेश चौगुले, विनायक इंचल, सुहास गावडे, राजेंद्र कणेरी, राजू पाटील, परशराम बेकवाडकर, संतोष कणेरी, महेश पालकर यासह शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.