वार्ताहर / पुलाची शिरोली
खडीने भरलेल्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटून पुलाची शिरोलीतील सनद कॅालनीमध्ये अपघात झाला. या अपघातात मोठा अनर्थ टळला असुन चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर एका मोटारसायकलचा व टपरीचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात शुक्रवारी दूपारी एक वाजता झाला.
साईकृपा कनस्ट्रक्शन टोप ( गंगाराम नगर) हा डंपर खाणीतून खडी घेवून शिरोली गावात येत होता. तो डंपर सनद कॅालनी मधून भरधाव वेगाने जात असता चालकाचा अचानक डंपरवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीला धडक दिली. या धडकीने ती टपरी सुमारे वीस फुट अंतरावर उडून पडली. त्यानंतर तो डंपर हिरोहोंडा मोटारसायकलला धडकून शिवसुत्र मंडळाच्या भितींला जावून धडकला. या धडकीत मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे. तसेच डंपरचेही नुकसान झाले आहे. अपघातस्थळी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मोठा अनर्थ टळला……
लॅाकडाऊनमुळे शिवसुत्र मंडळाच्या मंडपात अनेक लोक विश्रांतीसाठी व कांही तरुण गप्पा मारत बसले होते. अचानक डंपर येवून भिंतीला धडकून बंद पडला. तो डंपरवरील इमारतीच्या वरांड्यात घुसला असता तर जिवीतहानी मोठ्या प्रमाणात झाली असती.