भाग्यनगर मेन रोडवर चिखलाचे साम्राज्य
प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर मेन रोडवरील डेनेज ब्लॉक झाल्याने समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. तसेच येथील रस्ता खराब झाल्याने खड्डय़ात पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना या मार्गावरून जाणे कठीण बनले होते. मात्र आता येथील खड्डय़ांची डागडुजी करण्याऐवजी रस्त्याच्या मधेच मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. ऐन पावसाळय़ातच रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांची डागडुजी करण्याऐवजी खड्डय़ांमध्ये माती टाकण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील खड्डय़ात खडी टाकण्याऐवजी माती टाकण्यात आल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे याठिकाणी खड्डय़ांत घालण्यात आलेली माती लवकरात लवकर हटवावी आणि योग्यरित्या डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.