प्रतिनिधी/ बेळगाव
खनगाव खुर्दचे सुपुत्र अमीत शंकर पाटील यांची हवाई दलामध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. अमीत हे प्रारंभापासूनच हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. केंद्रीय विद्यालय येथे शालेय शिक्षण पूर्ण करून केएलई इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर ही पदवी घेऊन त्यांनी एकसमध्ये काही काळ सेवा बजावली. त्यानंतर एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टची परीक्षा देऊन घवघवीत यश प्राप्त केले. त्यामुळे ‘इंडियन एअरफोर्स अकॅडमी’ हैदराबाद येथे टेनिंगसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. संरक्षण दलात जाण्याची त्यांची लहानपणापासूनच इच्छा होती. टेनिंग पूर्ण केल्यानंतर अमित यांची फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे.
अमित नुकतेच खनगावला आल्यावेळी रक्षक कॉलनी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्त शंकर पाटील व कल्पना पाटील यांचे ते सुपूत्र आहेत.