क्रिडा प्रतिनिधी /बेळगाव
खनगाव येथे गुढीपाडवा व बसवाण्णा यात्रेनिमित्त खळय़ांच्या कुस्त्यांचे जंगी मैदान आज सोमवार दि. 4 एप्रिल रोजी खनगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे. या मैदानातील प्रमुख कुस्ती दिल्लीचा जितू गुजर व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती बंटी हरियाणा वि. कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनी यांच्यात, तिसऱया क्रमांकाची कुस्ती आप्पासाहेब इंगळगी दर्गा वि. अमोल नरले सांगली, चौथा क्रमांक रंगा सांगली वि. सुनिल यांच्यात, पाचवा क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी व सिद्धू यांच्यात, सहावी कुस्ती रोहित ल. कंग्राळी वि. विक्रम शिनोळी, सातवा क्रमांक सुशांत ल. कंग्राळी वि. प्रशांत, आठवा क्रमांक महादेव इटगी वि. निरंजन येळ्ळुर, नववा क्रमांक रूपेश कर्ले वि. कुबेर पिरनवाडी, दहावा क्रमांक प्रसाद वि. श्रीकांत यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. त्याशिवाय मेंढय़ाच्या कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे.