मोठय़ा उत्साहात बैलगाडीसह भक्तगण निघाले
प्रतिनिधी / बेळगाव
खनगाव खुर्द (ता.बेळगाव) येथील भाविक दरवषी जोतिबा डोंगरला सासनकाठी घेऊन रवाना होतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र यावषी कोरोना कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे खनगाव खुर्दचे भाविक अत्यंत उत्साहाने जोतिबा डोंगराकडे रवाना झाले आहेत.
गेल्या 28 वर्षांपासून जोतिबाचे भक्त सुरेश अण्णू पाटील, बाळू कोळद्री, बसवाणी इराप्पा पाटील हे बैलगाडी घेऊन जोतिबाला जात असतात. यावषीही मोठय़ा आनंदाने हे सर्व जण आनंदाने गेले आहेत. तीन बैलगाडी व भक्तगण मंगळवार दि. 12 रोजी जोतिबा डोंगरावर पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी चार दिवस राहून ते परतणार आहेत.
जोतिबा डोंगरावरुन 16 रोजी ते खणगावकडे प्रस्तान करणार आहेत. त्यानंतर गावामध्ये प्रसादाने याची सांगता होणार आहे. खणगाव खुर्द येथील भक्त मोठय़ा प्रमाणात जोतिबा डोंगरावर जातात. त्या ठिकाणी भक्तीभावाने पूजा, अर्चा करुन ते माघारी फिरणार आहेत. यावषी जोतिबा डोंगरावरील कोरोनाचे निर्बंध हटविल्याने या भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते.