कॅम्प पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी \ बेळगाव
खबरदारीची उपाय योजना म्हणून कॅम्प पोलिसांनी बुधवारी विजयनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर सीआरपीसी कलम 110(ई)(जी) कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र अविनाश दिवटे (वय 20, रा. विजयनगर) असे त्याचे नाव आहे. बुधवारी अटकेची कारवाई पूर्ण करुन त्याला विशेष दंडाधिकाऱयांसमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.