लोणंद / वार्ताहर :
खराडेवाडी ता.फलटण हद्दीतील बडेखान ते साखरवाडी रोडवर रेल्वे फाटकाजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी एका युवकाच्या मोटारसायकलसह त्याचे दोन मोबाईल हिसकावून पलायन केले.
लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुकवारी रात्री 08.30 वाजणेच्या सुमारास बडेखान ते साखरवाडी रस्त्यावरून अनोपा मुला राम (वय 23, सध्या रा.तिरमती अपार्टमेंट कोळकी फलटण) हा आपल्या मोटरसायकल क्रमांक (MH.11 DC.4954) वरून प्रवास करत होता. दरम्यान, खराडेवाडी ता.फलटण गावचे हद्दीत आल्यावर मोटरसायकलवरील अनोळखी तीन इसमांनी त्यांना थांबवून साखरवाडीला रोड कोणता जातो, अशी विचारणा केली. त्यानंतर मारहाण करून मोटरसायकल दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पलायन केले.
या चोरीची माहिती मिळताच सपोनि विशाल वायकर व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.